Anand Mohan Singh : ज्याच्या सुटकेसाठी तुरुंगाच्या नियमात बदल केला तो गँगस्टर राजकारणी आनंद मोहन सिंह कोण ?

सरकारनामा ब्यूरो

जन्म

आनंद मोहन सिंह याचा जन्म २८ जानेवारी १९५४ रोजी बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील पचगछिया गावात झाला.

Anand Mohan Singh | Sarkarnama

गुन्हेगारी विश्वात दबदबा

आनंदने वयाच्या १७ व्या वर्षी राजकीय जीवनात प्रवेश केला. पुढे त्याने गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण केला.

Anand Mohan Singh | Sarkarnama

पक्षाची स्थापना

१९९३ मध्ये त्याने बिहार पिपल्स पार्टी (बीपीपी) स्थापन केली. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानतंर त्याने विविध पक्षांशी हातमिळवणी करून निवडणुका जिंकल्या. तुरुंगात असतानाही त्याने काही निवडणुका जिंकल्या.

Anand Mohan Singh | Sarkarnama

दंडाधिकाऱ्याची हत्या

आनंद मोहन सिंह याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील १९९४ मधील गोपालगंजच्या जिल्हा दंडाधिकारी जी. कृष्णैया यांच्या हत्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

Anand Mohan Singh | Sarkarnama

फाशीची शिक्षा

या प्रकरणी आनंद मोहनला २००७ मध्ये न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. तर २००८ मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली. आता पर्यंत त्यांने १४ वर्षांचा कारावास भोगला.

Anand Mohan Singh | Sarkarnama

नियमात बदल

ऑन ड्युटी सरकारी कर्माचाऱ्याचा खून केल्यास मिळालेली शिक्षा शेवटपर्यंत भोगावी लागते. या नियमातच बदल केल्याने आनंद मोहन सिंहची आता सुटका झाली आहे.

Anand Mohan Singh | Sarkarnama

टीकेला उत्तर

सुटकेनंतर होणाऱ्या टीकेला आनंद सिंहने बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सोडल्याची आठवण करून भाजपला उत्तर दिले.

Anand Mohan Singh | Sarkarnama

पत्नी खासदार

आनंद सिंहची पत्नी लवली आनंद लोकसभेच्या खासदार आहेत, तर त्याचा मुलगा चेतन आनंद हा आमदार आहे.

Anand Mohan Singh | Sarkarnama

NEXT : शरद पवार यांच्या कर्तबगार लेकीची; अशी आहे राजकीय कारकीर्द !

येथे क्लिक करा