Amit Ujagare
UPI व्यवहारांवर 0.4 टक्के MDR चार्जेस लावण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्यांनाच सोसावा लागणार असल्यानं याला मोठा विरोध होत आहे.
सरकारच्या या निर्णयाला अशनीर ग्रोव्हर यांनी सातत्यानं विरोध दर्शवला आहे. ग्रोव्हर हे राजकीय व्यक्ती नाहीत मग नेमके कोण आहेत? आणि ते एवढा विरोध का करत आहेत? जाणून घेऊयात.
अशनीर ग्रोव्हर हे अनेकांना 'शार्क टँक इंडिया' या टिव्ही शोमुळं अनेकांना माहिती आहेत. हा शो भारतातील बेस्ट व्यावसायिक आयडिया प्रेझेंट करणाऱ्यांना निवडून त्यांच्या प्रोडक्टला फंडिग मिळवून देणारा शो होता.
या शो मध्ये अशनीर ग्रोव्हर यांनी जज म्हणून भूमिका निभावली होती. याच शो मुळं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. आता सध्या Amazon MX Player या ओटीटीवर त्यांचा 'राईज अँड फॉल' नावाचा शो सुरु आहे. या शोचं ते सुत्रसंचालन करत आहेत.
पण मुळात शार्क टँक या शोमध्ये जजचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली ती म्हणजे ते स्वतः एक यशश्वी उद्योजक आहेत. त्यांचं फिनटेक कंपनीचं स्टार्टअप सध्या प्रचंड प्रसिद्ध असून लोक युपीआय पेमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर करतात.
'फोन पे' हे त्यांचं फिनटेक अॅप असून याचे ते सहसंस्थापक आहेत. त्याचबरोबर या कंपनीचे ते कार्यकारी संचालक देखील होते. देशात जेव्हा युपीआय सेवेला सुरुवात झाली तेव्हा 'फोन पे' हे त्यांचं स्टार्टअप सुरु झालं. अद्यापही ते एक विश्वासार्ह युपीआय अॅप म्हणून ओळखलं जातं.
आत्तापर्यंत युपीआय व्यवहारांसाठी कुठलीही फी आकारली जात नव्हती. पण आता २००० रुपयांवरील प्रत्येक व्यवहारांसाठी सरकारनं MDR चार्जेस सुरु केले आहेत.
हे चार्जेस फक्त व्यापाऱ्यांना लागणार असल्याचं सरकार सांगत असलं तरी हे व्यापारी हे चार्जेस आपल्या वस्तुंच्या किंमती वाढवून ग्राहकाकडूनच वसूल करणार आहेत. त्यामुळं अशनीर ग्रोव्हर यांनी याला कडाडून विरोध केला आहे.
भारत युपीआय तंत्रज्ञानासाठी जगात ओळखला जातो, हे तंत्रज्ञान इतर कुठल्याही देशात नाही. त्यामुळं आपली ही ओळख पुसण्याचं काम आणि आपल्याच पायावर धोंडा मारुन घेण्याचं काम सरकार करत असल्याचं अशनीर ग्रोव्हर यांनी म्हटलं आहे.