Rashmi Mane
गेल्या दशकभरातील सर्व राजकीय चढउतारानंतरही आम आदमी पक्षाने दिल्लीच्या राजकारणात आपली पकड कायम ठेवली आहे.
पक्षात अशी काही नावे आहेत जी अगदी सुरुवातीपासूनच 'आप'शी जोडलेली आहेत.
आतिशी मार्लेना हा आम आदमी पक्षाचा असाच एक चेहरा आहे.
आतिशी, ज्यांना पूर्व दिल्लीतून रिंगणात उतरवण्यात आले होते,
आतिशी यांनी शिक्षण विभागाव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालविकास, ऊर्जा, कला-संस्कृती आणि भाषा तसेच पर्यटन विभागाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांनी जुलै 2015 ते एप्रिल 2018 पर्यंत दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे.
आतिशीच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, त्यांचे शालेय शिक्षण स्प्रिंगडेल्स स्कूल, नवी दिल्ली येथे झाले. त्यांनी 2001 मध्ये सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.
त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर, आतिशीने आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूलमध्ये काही काळ काम केले आणि संभावना इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी या स्वयंसेवी संस्थेशी त्या जोडल्या गेल्या.