Bansuri Swaraj : भाजपनं महत्वाची जबाबदारी दिलेल्या बांसुरी स्वराज कोण आहेत?

सरकारनामा ब्युरो

भाजपच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

Bansuri Swaraj | Sarkarnama

बांसुरी या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत.

Bansuri Swaraj | Sarkarnama

बांसुरी स्वराज यांची दिल्ली भाजपच्या कायदेशीर टीममध्ये सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Bansuri Swaraj | Sarkarnama

वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीए केले. त्यानंतर त्यांनी लंडनमधील बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास केला.

Bansuri Swaraj | Sarkarnama

स्वराज यांनी 2007 मध्ये दिल्लीच्या बार कौन्सिलमध्ये नावनोंदणी केली. त्यांना कायदेशीर व्यवसायात 16 वर्षांचा अनुभव आहे. त्या दिल्ली उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात.

Bansuri Swaraj | Sarkarnama

दिल्लीच्या राजकारणात सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर भाजपला चांगल्या प्रवक्त्याची उणीव भासत होती. ती बांसुरी यांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते.

Bansuri Swaraj | Sarkarnama

बांसुरी या २०२४ ची लोकसभा किंवा २०२५ ची दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Bansuri Swaraj | Sarkarnama

NEXT : गुन्हेगारी जगतापासून राजकारणाचा प्रवास: कोण आहे

येथे क्लिक करा