Architect of New Parliament : काशी विश्वनाथ ते नवीन संसद भवन, पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्टचे 'आर्किटेक्ट' बिमल पटेल आहेत तरी कोण?

Rashmi Mane

संसद भवनाचे शिल्पकार

देशाला मिळणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीचे शिल्पकार 'बिमल पटेल' आहेत, ज्यांना पंतप्रधानांचे 'मोदीज आर्किटेक्ट' म्हणूनही ओळखले जाते.

bimal patel

बिमल पटेल

बिमल पटेल यांची गणना देशातील बड्या आर्किटेक्टमध्ये केली जाते. पटेल यांनी अनेक मोठ्या इमारतींचे डिझाइन केले आहे. 

bimal patel

पद्मश्री

डॉ. बिमल पटेल यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

bimal patel | Sarkarnama

'एचसीपी' कंपनी

गुजरात मधील आर्किटेक्चर फर्म 'एचसीपी' कंपनीने नवीन संसदेचे डिझाइन तयार केले आहे.

bimal patel | Sarkarnama

प्रकल्प

विश्वनाथ धाम काशी विश्वनाथ मंदिर, गुजरात हायकोर्ट बिल्डिंग, IIM अहमदाबाद कॅम्पस, टाटा सीजीपीएल टाउनशिप, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठासह अनेक मोठ्या इमारतींचे डिझाइन केले आहे.

bimal patel | Sarkarnama

शिक्षण

सुरुवातीला त्यांना शास्त्रज्ञ बनायचे होते, पण त्यांनी CEPT विद्यापीठात आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केला. त्यांनी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये मास्टर, सिटी प्लॅनिंगमध्ये मास्टर आणि सिटी अँड रीजनल प्लॅनिंगमध्ये पीएचडी केली आहे.

bimal patel | Sarkarnama

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प अंतिम टप्प्यात नेण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या दोन किलोमीटरच्या 'कर्तव्य पथ'ची रचनाही बिमल पटेल यांनी नव्या पद्धतीने केली होती.

bimal patel | Sarkarnama

पुरस्कार

बिमल पटेल यांना वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड, यूएन सेंटर फॉर ह्युमन सेटलमेंट्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स अवॉर्ड मिळाला आहे. त्यांना शहरी नियोजन आणि डिझाइनमधील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान राष्ट्रीय पुरस्कार यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

bimal patel | Sarkarnama

Next : साहस आणि सौंदर्यांची खाण असणाऱ्या 'आयपीएस' अधिकारी मरिन जोसेफ