कॅप्टन स्मित मच्छार कोण आहेत? त्यांच्या आडनावाची आहे विशेष कहाणी

सरकारनामा ब्युरो

कमर्शिअल पायलट स्मित मच्छार यांचं सध्या जगभरात कौतुक होत आहे, कारण त्यांनी फ्लाय दुबई या विमानातील प्रवशांचा जीव वाचवून हिरोसारखी कामगिरी बजावली आहे.

Smit Machachar

याच विमानात ते स्वतः पायलट म्हणून विमानाच्या कॉकपिटमध्ये होते, त्यांचा ओमानचा सहपायलटनं त्यांच्यावर जीवघेणा वार केलेला असतानाही त्यांनी प्रसंगावधान राखत विमान हायजॅक होण्यापासून वाचवलं.

Smit Machachar

या सर्व कामगिरीमुळं सध्या मच्छार हे चर्चेत आहेत. पण त्यांच्या आडनावाची देखील सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. कारण मच्छर अर्थात डास या शब्दाशी त्यांचं आडनाव मिळतं जुळतं आहे.

Smit Machachar

पत्रकार शीला भट्ट यांनी एक्सवर स्मित मच्छार यांच्या आडनावाबाबत एक किस्सा शेअर केला आहे. मुंबईचे माजी नगरसेवक आणि भाजपच्या गुजराती सेलचे प्रमुख मंगल भानुशाली हे मच्छार कुटुंबियांना ओळखतात, यांनी पत्रकार भट्ट यांना हा किस्सा सांगितला आहे.

Smit Machachar

त्यानुसार, कॅप्टन स्मित मच्छार हे गुजराती ब्रह्मक्षत्रिय समाजातून येतात. पाकिस्तानच्या सीमाभागात हा समाज राहतो, पाकिस्तानच्या कराची शहरातही या आडनावाचे अनेक कुटुंब आहेत. तिथं मच्छार कॉलनी म्हणून एक वसाहत देखील आहे.

Smit Machachar

पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रात एकदा या मच्छार आडनावाबाबत एका लेखामध्ये म्हटलं होतं की, मच्छार हे आडनाव मच्छर पासून आलेलं नाही तर एका सिंधी शब्दातून तयार झाला आहे. ज्याचं कनेक्शन मच्छिमारांशी आहे.

Smit Machachar

दरम्यान, गुजरातमध्ये अशी अनेक आडनावं आहेत जी काही प्राण्यांच्या नावावरुन आणि किटकांच्या नावावरुन आलेली आहेत. यामध्ये हाथी (हत्ती), मंकड (किटक), मंकोडी, घोडा (घोडा), पोपट (पोपट) अशीही आडनावं आहेत.

Smit Machachar

कॅप्टन स्मित मच्छार हे मुळचे गुजराती असले तरी त्यांचं कुटुंब हे मुंबईतल्या घाटकोपर-टिळकनगर भागात राहतात. त्यांच्या कुटुंबाचा कपड्याचा व्यावसाय आहे. त्यांचा भाऊ देखील फ्लाय दुबईत पायलट म्हणून काम करतो.

Smit Machachar

स्मित मच्छार यांनी सुरुवातीला वेलिंगकर इन्स्टिट्युमधून टेक्स्टाईल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर ते न्यूझिलंडच्या मनेलँड एव्हिएशन कॉलेजमधून कमर्शिअल पायलटचं लायसन्स मिळवलं.

Smit Machachar

२०११ मध्ये त्यांनी स्पाईसजेट जॉईन केलं. त्यानंतर ते सिनिअरल कमांडर आणि लाईन कॅप्टन बनले. त्यानंतर जून २०२२ मध्ये ते फ्लाय दुबईत डायरेक्ट एन्ट्री पायलट म्हणून रुजू झाले.

Smit Machachar

स्मित मच्छार हे बोईंग 737-800 विमान चालवतात. त्यांना आत्तापर्यंत ९,७५० फ्लाईंग अवर्सचा अनुभव आहे.

Smit Machachar