Vijaykumar Dudhale
सिद्धेश कदम हे माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत.
महायुती सरकारने सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जऱ्हाड हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, प्रदीर्घ काळ गैरहजर असल्याचे कारण देऊन त्यांच्या जागी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभेच्या जागावाटपावरून माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रामदास कदम यांनी मुलगा सिद्धेश यांच्यासाठी खासदार गजानान कीर्तिकर यांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यावेळी शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता.
सिद्धेश कदम हे मुंबईतून लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून रंगली होती.
रामदास कदम यांचा एक मुलगा योगेश कदम हे दापोलीचे शिवसेनेचे आमदार आहेत, तर सिद्धेश कदम हे मुंबईत राजकारण करत आहेत.
सिद्धेश कदम यांच्या निवडीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. कदम यांची निवड ही नियमबाह्य आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
R
महाराष्ट्रातील महिला IAS अधिकारी