सरकारनामा ब्यूरो
आसाममधील काँग्रेस प्रवक्ते रीतम सिंह सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेले आहेत. काय आहे कारण वाचा...
रीतम सिंह यांनी नुकतीच सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे त्यांना शनिवारी (ता. 15 मार्च) अटक करण्यात आली आहे.
रीतम यांनी 13 मार्च ला 'X'या प्लॅटफाॅवर बीजेपीच्या आसाममधील वरिष्ठ नेत्यांवर पोस्ट केली होती.
2021 मध्ये आसामच्या धेमाजी जिल्ह्यात झालेल्या बलात्कार प्रकरणात तीन जणांना दोषी ठरवण्यात आलेल्या बातमीवरून रितम यांनी ही पोस्ट टाकली आहे.
पोस्टमध्ये भाजपचे तीन वरिष्ठ नेते मानव डेका, माजी प्रदेशाध्यक्ष भाबेश कलिता, माजी केंद्रीय मंत्री राजेन गोहेन नेत्यांविरुध्द कारवाई कधी होणार, अशी विचारणा केली होती.
हे प्रकरण दलित महिलेच्या जातीच्या आधारावर झालेल्या अपमानाशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.
तुम्ही दलित महिलेच्या पतीला बलात्कारी म्हणण्याचे समर्थन करत असाल, तर तुम्ही लोक काँग्रेस पक्षाला कोणत्या दिशेने घेऊन गेला आहात, हे दिसून येते, अशी टीका सरमा यांनी काँग्रेस नेत्यांवर केली आहे.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी अटकेवरून सरमा यांच्यावर टीका केली. ही कारवाई अत्याचारापेक्षाही वाईट असल्याचे म्हटले. ज्या पोस्टसाठी काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आली आहे, ते पूर्णपणे अयोग्य असल्याचे म्हटले.
रीतम हे एरोस्पेस इंजिनिअर आणि वकील आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय करिअरला सुरूवात केली.