बिहारमधील 'अवैध' मंत्र्यासाठी आमदारकी सोडणारा भाजपचा वरिष्ठ नेता कोण?

Amit Ujagare

राजकीय सेटलमेंट

बिहारमध्ये सध्या एका मंत्र्यासाठी नियमबाह्य पद्धतीनं राजकीय सेटलमेंट सुरु असल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणात सुप्रीम कोर्टानं कायद्याचा धाक दाखवल्यानंतर आता या मंत्र्यासाठी भाजपच्या एका वरिष्ठ आमदारानं बळी दिला गेला आहे.

Deepak Prakash

उपेंद्र कुशवाहा

राष्ट्रीय लोकमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांचे पुत्र दीपक प्रकाश हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही सम्राट चौधरी यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत आहेत.

Upendra Kushwaha

सदस्य नसताना आमदार

दीपक प्रकाश हे विधानसभा आणि विधानपरिषदेचे आमदार नसताना मंत्री म्हणून कार्यरत होते. यासाठी सहा महिन्यांचा अधिकृत कार्यकाळ असताना तो उलटून गेल्यानंतरही त्यांचं मंत्रीपद कायम होतं. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

Deepak Prakash with PM Modi

सुप्रीम कोर्टाचा कायद्याचा धाक

यावरुन सुप्रीम कोर्टानं बिहारच्या सम्राट चौधरी सरकारला नोटीस बजावली आणि ४ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठानं सरकारला विचारलं की, या प्रकरणात कायद्याचं काय?

Supreme Court

भाजपच्या वरिष्ठ आमदाराचा बळी

सुप्रीम कोर्टानं मंत्रीपद काढून घेण्याचा इशारा दिल्यानंतर आता भाजपनं देवेश कुमार या आपल्या आमदाराला विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा द्यायला भाग पाडलं आहे. देवेश कुमार राज्यपाल कोट्यातून १७ मार्च २०२१ रोजी विधानपरिषदेवर गेले, त्यांचा कार्यकाळ १६ मार्च २०२७ पर्यंत होता, त्यापूर्वीच त्यांनी सदस्यत्व सोडलं.

Devesh Kumar

राजीनामा दिला

देवेश कुमार यांनी शुक्रवारी सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडं आपला राजीनामा सोपवला. आता त्यांचा राजीनामा झाल्यानंतर या जागेवर निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

Devesh Kumar

कोण आहेत देवेश कुमार?

देवेश कुमार हे भाजपचे वरिष्ठ आमदार आहेत, त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९६४ रोजी झाला. ते स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी नेते यमुना कारजी यांचे नातू आहेत. सामाजिक-राजकीय वातावरणात देवेश कुमार सार्वजनिक जीवनात प्रवेश केला.

Devesh Kumar

शिक्षण काय?

देवेश कुमार यांचं शिक्षण एमए, एमफील पर्यंत झालं आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी मोठ्या काळापासून पत्रकार म्हणून काम केलं आहे. याकाळात त्यांनी राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर खोलवर काम केलं आहे.

Devesh Kumar

भाजपत मोठी जबाबदारी

भाजपशी जोडलं गेल्यानंतर देवेश कुमार हे बिहार भाजपचे प्रदेश महासिचव बनले. संघटनशक्ती आणि अनुभवामुळं त्यांना भाजपचा अत्यंत विश्वासून नेता मानलं जातं.

Devesh Kumar