फक्त भाजपविरोध की आणखी काही? मुंबई एअरपोर्टवर ताब्यात घेतलेले डॉ. संग्राम पाटील कोण आहेत?

Amit Ujagare

मुंबई एअरपोर्टवरुन ताब्यात

१० जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री २ वाजता डॉ. संग्राम पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांसह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं एअरपोर्टवरुन ताब्यात घेतलं. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

Dr. Sangram Patil

सरकारवर टीका

संग्राम पाटील हे गेल्या काही वर्षांपासून भारतातील मोदी सरकारच्या कारभारावर सातत्यानं टीका करत आहेत. त्यामुळं भारतात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Dr. Sangram Patil

कोण आहेत?

पण संग्राम पाटील यांची इतकी चर्चा होण्याचं कारण काय? त्यांची नेमकी ओळख काय आहे? जाणून घेऊयात.

Dr. Sangram Patil

एमबीबीएस-एमडी

संग्राम पाटील हे व्यावसायानं मेडिकल डॉक्टर आहेत. पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी अनस्थेशियालॉजीमध्ये एमबीबीएस आणि एमडी केलं आहे. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये जाऊनही पुढील वैद्यकीय शिक्षण घेतलं.

Dr. Sangram Patil

फेलोशिप

युकेमधील FRCA- Royal College of Anesthetists त्यांना फेलोशिप मिळाली आहे. याच रॉयल कॉलेजमधून त्यांनी फॅकल्टी ऑफ पेन मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट फोलोशिप मिळवली.

Dr. Sangram Patil

डिप्लोमा

तसंच स्वित्झर्लंड येथून युरोपियन सोसायटी ऑफ रिजनल अनेस्थेशिया अँड पेन थेरपी (ESRA) यांचा 'युरोपियन डिप्लोमा इन पेन मेडिसिन' (EDPM) हा डिप्लोमा केला आहे.

Dr. Sangram Patil

एमबीए

त्याचबरोबर युकेमधील कार्डिफ विद्यापीठातून त्यांनी पेन मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला आहे. तसंच हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये डॉ. संग्राम पाटील यांनी एमबीए देखील केलं आहे.

Dr. Sangram Patil

लेखक, व्याख्याते

डॉक्टरी पेशात असले तरी संग्राम पाटील हे लेखक आहेत, अनेक सामाजिक प्रश्नांवर ते लिहितात. भारतातल्या राजकीय परिस्थितीवरही ते बऱ्याचदा तुलनात्मक विश्लेषण करतात. त्याचबरोबर ब्लॉगर, व्याख्याते म्हणूनही ते ओळखले जातात.

Dr. Sangram Patil

मूळ गाव

संग्राम पाटील यांच मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे आहे. म्हणजेच खान्देशचे सुपुत्र म्हणून डॉ. संग्राम पाटील यांची ओळख आहे. पण सध्या ब्रिटनचं नागरिकत्व घेऊन आपल्या कुटुंबासह ते लंडनमध्ये स्थायिक झालेले आहेत.

Dr. Sangram Patil