Pradip Kurulkar Honeytrap : 'हनिट्रॅप'ला बळी पडलेले 'डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुळकर कोण?

Sunil Balasaheb Dhumal

'एटीएस'कडून अटक

पुण्यातील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुळकर यांना 'एटीएस'ने अटक केली. त्यांना ९ मेपर्यंत 'एटीएस' कोठडी सुनावण्यात आली.

ATS arrest P. M. Kurulkar | Sarkarnama

हेरगिरीचा आरोप

कुरुळकरांवर हेरगिरी करण्याच्या आणि पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत सुरक्षा-संवेदनशील माहिती सामायिक केल्याच्या आरोप आहे.

P. M. Kurulkar | Sarkarnama

इलेक्ट्रिकल इंजिनिअर

प्रदीप कुरुळकर यांचा जन्म 1963 मध्ये झाला. त्यांनी 1985 मध्ये 'सीओईपी' पुणे येथून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये (बीई) पदवी प्राप्त केली.

P. M. Kurulkar | Sarkarnama

'डीआरडीओ'साठी काम सुरू

1988 मध्ये कुरळकरांनी आवाडी येथे 'डीआरडीओ'साठी काम करण्यास सुरुवात केली.

DRDO | Sarkarnama

'आयआयटी'मधून पुढील शिक्षण

दरम्यान, त्यांनी IIT कानपूर येथून 'अॅडव्हान्स्ड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स' अभ्यासक्रम पूर्ण केला.

P. M. Kurulkar | Sarkarnama

'या' कौशल्यात माहेर

क्षेपणास्त्र प्रक्षेपकांची रचना आणि विकास, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करातील मोबाइल मानवरहित प्रणाली या क्षेत्रात त्यांचा हतखंडा आहे.

P. M. Kurulkar | Sarkarnama

'डीआरडीओ'चे संचालक

आता ते संशोधन आणि विकास आस्थापना (डीआरडीओ)च्या प्रीमियर सिस्टम्स अभियांत्रिकी प्रयोगशाळेत संचालक म्हणून कार्यरत होते.

P. M. Kurulkar | Sarkarnama

लष्करात महत्वाचे योगदान

एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून, कुरुळकर यांनी लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणांच्या डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

P. M. Kurulkar | Sarkarnama

NEXT : गुन्ह्यातील शिक्षेमुळे पद गमावलेले कोण आहेत नेते; पाहा फोटो