Jagdish Patil
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ कोलबर्न या सध्या चर्चेत आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एलिझाबेथ यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
एलिझाबेथ कोलबर्न गोगोई यांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI शी संबंध असल्याचा दावा हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही पाकिस्तान नियोजन आयोगाचे माजी सल्लागार अली तौकीर शेख यांच्या नेतृत्वाखाली CDKN इस्लामाबादमध्ये त्यांनी काम केल्याचा दावा केला आहे.
गौरव गोगोई आणि एलिझाबेथ यांची 2010 मध्ये भेट झाली होती. एलिझाबेथ या ब्रिटिश नागरिक असून या दोघांचं लग्न 2013 साली झालं
एलिझाबेथ यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे. सध्या त्या ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटसाठी काम करतात.
हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्या पत्नीने 12 वर्षांपासून भारतीय नागरिकत्वही घेतलं नसल्याचाही दावा केला आहे.
भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर गौरव गोगोई यांनी प्रतिक्रिया दिली, "माझी पत्नी ISI शी संबंधित असेल तर मी RAW शी संबंधित आहे", असं ते म्हणाले.