Rashmi Mane
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर लोकसभेत जोरदार निशाणा साधणारे आसाममधील युवा काँग्रेस खासदार गौरव गोगोई.
गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वांखालील भाजप सरकारच्या विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचे नेतृत्व केले.
गौरव गोगोई हे आसाममधील युवा खासदार तसेच काँग्रेसचे उपनेते आहेत.
आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे ते पुत्र असून आसाममधील काँग्रेसचा युवा चेहरा अशी त्यांची ओळख आहे.
दिल्लीतील 'सेंट कोलंबा स्कूल'मधून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी बी.टेक केले आहे.
२००४ साली इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंगच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानी काही काळ एयरटेलच्या मार्केटिंग टीममध्ये काम केले आहे.
काही वर्ष काम केल्यानंतर 'युएसए'मध्ये लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यासासाठी गेले. न्यूयॉर्क विश्वविद्यायामध्ये लोकप्रशासनची पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे.
गौरव गोगोई हे २०१४ ला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरले. २०१४ साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून कलियाबोर लोकसभा मतदारसंघातून ९३ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले आहेत.