Roshan More
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार आहे. तर, भाजपकडे उपमहापौर पद मिळणार आहे.
शिवसेनेकडून हर्षाली थवील यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
विरोधी पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे थवील यांनी निवड बिनविरोध होणार आहे.
हर्षाली थवील या दुसऱ्यांना महापालिकेत विजयी झाल्या आहेत. एसटी प्रवर्गातून त्यांना महापौर पदाची संधी मिळणार आहे.
त्या उच्चशिक्षित असून त्यांचे एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.
थवील यांनी या विकासकामात आघाडीवर असलेल्या नगरसेविका आहेत. सर्वाधिक विकास निधी खर्च करणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.