Rashmi Mane
भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जया वर्मा सिन्हा या रेल्वेच्या अध्यक्ष आणि सीईओ पदावर नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
1 सप्टेंबर 2023 ला जया वर्मा यांनी पदभार स्वीकारला. वर्मा या रेल्वे बोर्डात सदस्य म्हणून 35 वर्षे कार्यरत होत्या.
जया वर्मा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. भारतीय रेल्वे वाहतूक सेवा 1988 बॅचच्या अधिकारी आहेत.
जया वर्मा सिन्हा यांचा जन्म प्रयागराज येथे झाला. शालेय शिक्षणापासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचे शिक्षण त्यांनी प्रयागराजमधूनच पूर्ण केले आहे. त्यांचे वडील व्हीबी वर्मा कॅग कार्यालयात क्लास वन अधिकारी होते.
सेंट मेरी कॉन्व्हेंट इंटर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर जया वर्मा सिन्हा यांनी अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc (PCM) केले. त्यानंतर त्यांनी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
जया वर्मा यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत (IRTS) रुजू झाले. वर्मा यांची प्रशिक्षणानंतर 1990 मध्ये कानपूर 'सेंट्रल स्टेशनवर असिस्टंट कमर्शियल मॅनेजर' (ACM) म्हणून निवड झाली.
जया वर्मा सिन्हा यांनी ढाका, बांगलादेश येथे रेल्वे सल्लागार म्हणून चार वर्षे काम केले आणि त्यांच्या कार्यकाळात कोलकाता ते ढाका दरम्यान मैत्री एक्स्प्रेस चालवण्यात आली.