Kiran Patel: पीएमओ अधिकारी सांगून 'झेड प्लस सेक्युरिटी' घेणारा तोतया, किरण पटेल कोण?

अनुराधा धावडे

पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या किरण पटेल गेल्या चार महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमधून पंतप्रधान कार्यालयात विशेष सचिव म्हणून काम करत होता.

Kiran Patel | Sarkarnama

तिथे त्याने या जम्मू काश्मीरमधील अधिकार्‍यांसोबत बैठका घेत त्याने झेड प्लस सुरक्षाही मिळवली

Kiran Patel | Sarkarnama

याच काळात त्याने पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरील (LOC) अतिशय संवेदनशील ठिकाणी भेटीगाठी दिल्या.

Kiran Patel | Sarkarnama

किरण पटेल हा गुजरातमधील अहमदाबादचा रहिवासी असून आपण पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त संचालक असल्याचा दावा केला आहे.

Kiran Patel | Sarkarnama

पण गुप्तचर यंत्रणांना 2 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्रीनगर पोलिसांनी तोतया पटेलला २ मार्च ला अटक केली.

Kiran Patel | Sarkarnama

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भाई पटेल यांच्याकडे 10 बनावट व्हिजिटिंग कार्ड आणि दोन मोबाईल फोन सापडले आहेत.

Kiran Patel | Sarkarnama

किरण भाई पटेल यांच्यावर बनावट हुद्दा आणि कागदपत्रांद्वारे Z+ सुरक्षा घेतल्याचा आणि सामान्य माणसाला मनाई असलेल्या ठिकाणी जाण्याचा आरोप आहे.

Kiran Patel | Sarkarnama

किरण पटेल ने मोठमोठ्या नेतेमंडळींसोबत असलेले फोटो दाखवून संबंधित अधिकाऱ्यांनाही फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Kiran Patel | Sarkarnama