महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश मीना कोण आहेत? भाजपशी आहे खास कनेक्शन

Amit Ujagare

आयएएस अधिकारी

महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून आयएएस अधिकारी राजेश मीना यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांचं स्वागत केलं.

Rajesh Meena

माहिती नसलेल्या गोष्टी

मुख्य सचिव असलेले राजेश मीना यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात.

Rajesh Meena

जन्मभूमी, कर्मभूमी

राजेश मीना हे मूळचे राजस्थानमधल्या सवाई माधोपूरचे असून सामान्य कुटुंबातून आले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात त्यांनी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयातही विविध पदांवर काम केलं आहे.

Rajesh Meena

भाजप कनेक्शन

राजेश मीना हे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या जसकौर मीना यांचे जावई असून त्यांची मुलगी अर्चना मीना यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.

Rajesh Meena

पत्नी काय करते?

राजेश मीना यांच्या पत्नी अर्चना मीना या हॉटेल व्यावसायिक आहेत. तसंच समाजसेवेतही त्या अग्रेसर असतात.

Rajesh Meena

अत्यंत निश्चयी

राजेश मीना हे अत्यंत निश्चयी अधिकारी असून आपला निर्णय ते सहजासहजी बदलत नाहीत, अशी त्यांची ख्याती आहे.

Rajesh Meena

शालेय जीवनापासून आवड

लहानपणीचा किस्सा म्हणजे ८व्या इयत्तेत असल्यापासून ते आपल्या नावापुढं आयएएएस असं लिहीत, पुढे अभ्यास करून त्यांनी ते खरं करूनही दाखवलं.

Rajesh Meena

कमी कालावधी, जास्त काम

राजेश मीना यांना या पदावर कमी कालावधीसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ ६१ दिवसच ते या पदावर काम करणार असून ऑगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत.

Rajesh Meena

इलेक्शनचा काळ

येत्या दोन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी असणार आहे. त्यामुळं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीना काय महत्वाचे निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Local Election