कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले मल्लिकार्जुन खर्गे कोण?

अनुराधा धावडे

कॉंग्रेसमध्ये अनेक वर्षांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणूकीच्या रिंगणात दिग्विजय सिंह, शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे ही तीन नावे चर्चेत आहे.

mallikarjun kharge | Sarkarnama

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आहेत. कट्टर कॉंग्रेसी म्हणूनही ते ओळखले जातात. पाच दशकांहून अधिक काळ ते कॉंग्रेसमध्ये आहेत.

mallikarjun kharge | Sarkarnama

महाविद्यालयीन जीवनापासून खर्गे कॉंग्रेसशी जोडले गेले तळागाळातून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात करुन ते संसदेपर्यंत पोहचले.

mallikarjun kharge | Sarkarnama

महाविद्यालयात शिकत असताना त्यांची विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली. याच काळात त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली.

mallikarjun kharge | Sarkarnama

कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी 1969 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1972 मध्ये पहिल्यांदा कर्नाटकमधील गुरुमितकल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली.

mallikarjun kharge | Sarkarnama

खर्गे हे कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. ते 8 वेळा आमदार आणि 2 वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत.सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.

mallikarjun kharge | Sarkarnama

त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते फक्त एकदाच निवडणूक हरले आहेत आणि तेही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत.

mallikarjun kharge | Sarkarnama

खर्गे यांचा सलग १० निवडणुका जिंकण्याचा रेकॉर्ड आहे. 8 वेळा विधानसभा आणि 2 वेळा लोकसभा.

mallikarjun kharge | Sarkarnama

2014 पर्यंत खरगे यांनी जी काही निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले.

mallikarjun kharge | Sarkarnama

2014 मध्ये पक्षाच्या पराभवानंतर ते लोकसभेत काँग्रेसचे नेते होते आणि सध्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.

mallikarjun kharge | Sarkarnama
Sarkarnama | Sarkarnama