Manisha Kayande : जाणून घ्या, 'वुमन सेफ्टी' विषयाच्या अभ्यास दौऱ्यावर युरोपला जाणाऱ्या डॉ. मनिषा कायंदे यांच्याबद्दल...

Rashmi Mane

सर्वपक्षीय नेत्यांचा युरोप दौरा

राज्यातील सर्वपक्षीय २२ आमदारांचा युरोप दौऱ्यावर जाणार आहेत.

Manisha Kayande | Sarkarnama

अभ्यास दौरा

या दौऱ्यात महिलांच्या प्रश्नांवर अभ्यास केला जाणार आहे. युरोप खंडातील जर्मनी, नेदरलँड आणि इंग्लंड या प्रगत देशांमध्ये या आमदारांचा अभ्यास दौरा असणार आहे. आमदारांच्या या अभ्यास दौऱ्यात स्त्री-सक्षमीकरणावर भर असणार आहे. 

Manisha Kayande | Sarkarnama

शिंदे गटातून

शिंदे- फडणवीस-पवार सरकारच्यावतीने मनिषा कायंदे युरोप दौऱ्यावर जात आहेत.

Manisha Kayande | Sarkarnama

जाणून घेऊया, कोण आहेत मनिषा कायंदे

मनिषा कायंदे या विधान परिषेदेच्या सदस्या आहेत. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे.

Manisha Kayande | Sarkarnama

घरातूनच राजकारणाचा बाळकडू

लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं.

Manisha Kayande | Sarkarnama

नगरसेवकपदाची निवडणूक

या काळात त्यांनी जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. 1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला.

Manisha Kayande | Sarkarnama

2009मध्ये लढल्या होत्या निवडणूक

2009मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मनसेची लाट असल्याने त्यांचा पराभव झाला. पराभव होऊनही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी विविध प्रश्नांवर सुमारे सव्वाशे आंदोलने केली.

Manisha Kayande | Sarkarnama

कायंदे या महिलांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवणाऱ्या

महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या 'अवनी' या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत. कायंदे यांनी 11 वर्षे मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्या म्हणून काम पाहिले. महिलांवरील अत्याचार, महिला आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासातील समस्या आदी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली होती.

Manisha Kayande | Sarkarnama

Next : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये PM मोदींचे खास स्वागत, पाहा फोटो !