Rashmi Mane
कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळवून देणारे रणनितीकार असलेले नरेश अरोरा.
प्रशांत किशोरनंतर राजकीय रणनितीकार म्हणून नरेश अरोरा यांच्याकडे पाहिले जात आहे.
अरोरा डिजिटल मार्केटिंगचे ते मास्टर मानले जातात. त्यांनीच कर्नाटक निवडणुकीचे नियोजन केले होते.
पंजाबमधील असलेले नरेश हे मुळात टेक्सटाईल इंजिनीअर आहे. परंतु आता डिजिटल मार्केटिंगमध्ये तज्ञ आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे काम ते करत होते.
नरेश अरोरा यांची गेल्या सात वर्षापासून 'डिझाईन बॉक्स कंपनी' निवडणूक व्यवस्थापन पाहत आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहता मागून काम करण्यावर त्याचा विश्वास आहे. ते राजस्थानमध्येही काम करत आहेत.
नरेश अरोरा यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये काँग्रेसच्या सुनिल जाखड यांचा 1 लाख 90 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. तसेच, हिमाचल प्रदेश पोटनिवडणूक, 2018 मधील पंजाब नगरपालिका निवडणूक आणि 2018 मधील शाहकोट पोटनिवडणुकीसाठी त्यांनी काम केले आहे.
पंजाब सरकारच्या स्पेशल टास्क फोर्स (STF) चे डिजिटल मीडिया स्पेशालिस्ट देखील आहेत.