Mayur Ratnaparkhe
चंदीगड जिल्हा न्यायालयात १७ वर्षांपासून सुरू असलेल्या Cash at Judge's Door' प्रकरणात निकाल आला आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने २००८च्या भ्रष्टाचार प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश निर्मल यादव यांची निर्दोष मुक्तता केली.
न्यायमूर्ती निर्मल यादव या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिल्या आहेत.
सध्या त्या निवृत्त असून Cash at Judge's Door या खटल्यामुळे देशभरातील लोक त्यांना ओळखतात.
या प्रकरणात त्या १७ वर्षे आरोपी होत्या आणि विशेष सीबीआय न्यायाधीश अलका मलिक यांनी त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले.
१३ ऑगस्ट २००८ रोजी हे प्रकरण चर्चेत आले होते.
सीबीआयने न्यायमूर्ती निर्मल यादव आणि संजीव बन्सल आणि इतर अनेक मोठ्या उद्योगपतींविरुद्ध गुन्हा दाखल केला
पुराव्याअभावी न्यायमूर्ती निर्मल यादव यांची निर्दोष मुक्तता केली गेली.