Rashmi Mane
भाजपने धेंपे इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक पल्लवी धेंपे यांना दक्षिण गोव्यातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
गोव्याच्या इतिहासात भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एका महिलेला उमेदवार म्हणून घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या 111 उमेदवारांच्या यादीत दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पल्लवी धेंपे या गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ, एमआयटी पुणे येथून त्यांनी रसायनशास्त्र पदवीधर तसेच व्यवसाय व्यवस्थापनात एमबीए केले आहे.
पल्लवी या धेंपे इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आहेत, कंपनीचे मीडिया आणि रिअल इस्टेट व्यवसाय सांभाळतात.
सध्या दक्षिण गोव्याची जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. 1962 पासून ही जागा भाजपने केवळ दोनदा जिंकली आहे.
पल्लवी यांनी 2012 ते 2016 या काळात गोवा विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक परिषदेच्या सदस्या म्हणून काम केले आहे.
पल्लवी या भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या महिला परिषदेच्या सर्व कोअर कमिटीच्या सदस्य आहेत.
R