Rashmi Mane
मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे) गटाचे ज्येष्ठ नेते स्व. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या कन्या प्रांजल महाडेश्वर यांची युवासेना सह-सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रांजल महाडेश्वर यांची नियुक्ती केली आहे.
महाडेश्वर यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे तसेच आंदोलने व राजकीय, सामाजिक विषयांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
प्रांजल यांच्या रुपाने महाडेश्वर कुटुंबातील पुढची पिढी राजकारणात उतरली आहे.
शिवसेनेचे खंदे समर्थक, ठाकरेंचे निकटवर्तीय आणि विश्वासू अशी महाडेश्वर कुटुंबीयांची ओळख आहे.
प्रांजल यांच्या आई पुजा महाडेश्वर या देखील नगरससेविका होत्या.
आई-वडिलांकडूनच राजकारणाचा बाळकडू मिळाला आहे.