राजकीय समीकरणं बदलणार? उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत असलेले रामनाथ ठाकुर कोण?

Rashmi Mane

लवकरच होणार निवडणूक

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाने नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.

अधिकृत उमेदवाराची

एनडीएने अद्याप त्यांच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. मात्र, एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे रामनाथ ठाकुर!

कोण आहेत रामनाथ ठाकुर?

रामनाथ ठाकुर हे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर यांचे सुपुत्र. सध्या राज्यसभेचे खासदार आणि कृषी राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

राजकीय कारकीर्द

ठाकूर हे 2005-2010 दरम्यान बिहार सरकारमध्ये मंत्री होते. स्वच्छ प्रतिमा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.

चर्चेचे कारण काय?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जेडीयूचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकुर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बिहार फॅक्टर महत्त्वाचा

रामनाथ ठाकुर हे बिहारमधून आहेत. बिहारमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तिथे अति पिछड्या वर्गांची मोठी लोकसंख्या आहे.

विरोधकांना कठीण टास्क?

रामनाथ ठाकुर यांची प्रतिमा आणि पार्श्वभूमी पाहता, विरोधकांना त्यांचा विरोध करणं कठीण ठरू शकतं.

काय होणार पुढे?

पुढे काय होणार याबाबत उमेदवारीबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र रामनाथ ठाकुर हे उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील एक महत्त्वाचं नाव ठरत आहेत.

Next : देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर 'या' 8 नावांकडे सर्वांचे लक्ष!

येथे क्लिक करा