Roshan More
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या कलेक्टर रुचिका चौहान यांनी सरकारी वाहनाऐवजी इलेक्ट्रीक रिक्षाने ऑफीसला पोहोचल्या.
रुचिका यांचा ईरिक्षाने केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुरुवारी पर्यावरण दिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी ईरिक्षाने प्रवास करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
रुचिका यांचा जन्म 1984 मध्ये इंदौरमध्ये झाला.
त्यांनी प्राथमिक शिक्षण इंदौरमधून घेतले. तसेच त्यांनी इलेक्ट्राॅनिक्स अँड कम्युनिकेशमध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतली आहे.
बीईची पदवी घेतल्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी सुरु केली. 2011 मध्ये त्या IAS अधिकारी झाल्या.
2011 मध्ये मध्य प्रदेशमधून पास होत IAS होणाऱ्या रुची या एकमेव विद्यार्थी होत्या. युपीएससीमध्ये त्यांचा रँक 50 होता.