अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारी गायिका अंजली भारती कोण?

Amit Ujagare

गायिका, अभिनेत्री

अंजली भारती या एक नागपूरच्या रहिवासी असलेल्या गायिका आणि अभिनेत्री आहेत.

Anjali Bharati

आंबेडकरी गायिका

आंबेडकरी चळवळीतील एक सक्रीय कलाकार म्हणून अंजली भारतींची ओळख आहे. ऑर्केस्ट्रा, स्टेजशोज आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांमधून अंजली भारतींनी चळवळीची गाणीही गायली आहेत.

Anjali Bharati

'दीदी अंजली भारती'

'दीदी अंजली भारती' नावानं सोशल मीडियावर ही गायिका प्रसिद्ध आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टा आणि युट्यूब याच नावानं त्यांची अकाऊंट्स आहेत.

Anjali Bharati

6 लाख सबस्क्रायबर

युट्यूबवर दीदी अंजली भारती नावाच्या अकाऊंट्सला सुमारे ६ लाख सबस्क्रायबर आहे.

Anjali Bharati

बाबासाहेबांची गाणी

या व्हिडिओजमध्ये हजारोंच्या संख्येनं गाण्याचे व्हिडिओज आहेत. त्यातही प्रामुख्यानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गायलेले व्हिडिओज आहेत.

Anjali Bharati

बेधडक विधानं

कार्यक्रमांदरम्यान आपल्या बेधडक विधानांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अंजली भारती यांची नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मात्र जीभ घसरली.

Anjali Bharati

अमृता फडणवीसांवर टिप्पणी

नागपूरमध्ये नुकताच एक गायनाचा एक कार्यक्रम सुरु असताना, अंजली भारती यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा संदर्भ देताना सरकारवर टीका करताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

Anjali Bharati

टीकेचे धनी

या टिप्पणीमुळं सध्या अंजली भारती या प्रचंड टीकेच्या धनी झाल्या आहेत. एका आंबेडकरी स्त्रीनं अशा पद्धतीनं टिप्पणी करणं गैर असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. खुद्द आंबेडकरी समाजातूनच त्यांना आता टीकेचा सामना करावा लागत आहे.

Anjali Bharati