Jagdish Patil
काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत निलंबित केलेल्या सुलभा खोडके यांना राष्ट्रवादीकडून (अजित पवार) उमेदवारी देण्यात आली आहे.
खोडके यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका काँग्रेसकडून ठेवण्यात आला होता.
काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यांच्यावर कारवाई केली होती.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केल्याची चर्चा होती. यामध्ये खोडके यांच्या नावाचा समावेश होता.
काँग्रेसने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतच त्यांच्या नावाचा समावेश असल्याने या चर्चांवर शिकामोर्तब झालं आहे.
2014 साली खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करत बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली.