अनुराधा धावडे
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज (१९ मे) आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदाची शपथ दिली.
रायपूरमध्ये 29 ऑगस्ट 1964 रोजी प्रशांत कुमार मिश्रा यांचा जन्म झाला.बीएस्सीनंतर त्यांनी गुरु घासीदास विद्यापीठातून एलएलबी पदवी मिळवली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी छत्तीसगडमधील रायगड जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.1987 मध्ये ते वकील झाले. छत्तीसगड राज्य बार कौन्सिलचे 2 वर्षे अध्यक्षही होते.
2007 मध्ये त्यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली. 10 डिसेंबर 2009 रोजी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. 13 ऑक्टोबर 2021 रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती म्हणून शपथ घेतली.
न्यायमूर्ती मिश्रा यांनी 13 वर्षे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मिश्रा हे उच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांच्या अखिल भारतीय ज्येष्ठता यादीमध्ये 21 व्या क्रमांकावर आहेत.
गेल्या वर्षी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आंध्रप्रदेश सरकारच्या चांगलेच फटकारले होते. YSRC-च्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारला तीन राजधान्या हव्या होत्या.
आंध्रप्रदेश सरकारला अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूलमध्ये राजधानीचे विभाजन करायचे होते. त्यावर मिश्रा यांनी निकाल देताना अमरावती हीच राज्याची राजधानी असल्याचे जाहीर केले.