Rashmi Mane
G20 शिखर परिषदेसाठी दिल्ली पूर्णपणे तयार आहे. 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत 18 वी G20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. G20 साठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनही दिल्लीत पोहोचले आहेत.
जो बायडेन विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जो बायडेन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
जो बायडेन यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलगीही उपस्थित होती, ती मुलगी कोण आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या चिमुरड्या मुलीच नाव 'माया गार्सेटी' असून अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांची ती मुलगी आहे. माया यांना यापूर्वी अनेक वेळा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबत दिसून आली आहे.
'माया गार्सेट्टी' हीने जो बायडेन यांना मिठी मारली.
'एरिक गार्सेटी' हे अमेरिकेचे भारतातील राजदूत आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तसेच ते ऑक्सफर्ड विद्यापीठात स्कॉलर होते आणि त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे.
भारतात पोहोचल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली.