Rashmi Mane
'मेट्रो लेडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे या 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'च्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
सांगली गावात जन्मलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे 2015 मध्ये मुंबई मेट्रो-3 ची धुरा सुपुर्द करण्यात आली.
अश्विनी भिडेंमुळे मेट्रोचं काम अत्यंत वेगाने सुरू असतं, त्यामुळेच त्यांना 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख मिळाली. तर, एका अधिकाऱ्याने सहज बोलताना त्यांचा उल्लेख 'टास्कमास्टर' असा देखील केला होता.
'मेट्र्रो व्हूमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे, आरेमधील झाडं मेट्रो कारशेडसाठी तोडल्यानंतर चर्चेत आल्या होत्या.
मेट्रो प्रकल्पात येणाऱ्या अडथळे यशस्वीपणे पार करत त्यांनी मेट्रो प्रकल्प पूर्ण केले. जमीन अधिग्रहन, तसेच अनेक सोसायट्यांची जमीन घेण्यासाठी प्रयत्न, याशिवाय आरे कारशेडला झालेला प्रचंड विरोध या सगळ्या घडामोडींदरम्यान भिडे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते.
अश्विनी भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील 1995 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.
सांगलीत ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केल आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विभागीय अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबई रेल मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्यादृष्टीने तंत्रज्ञान आधारित विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संबंधित पायाभूत सुविधांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.