Rashmi Mane
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला.
यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर' केले. प्रश्न असा पडतो की या हवाई हल्ल्याला हे नाव कोणी दिले?
भारतातील दहशतवादी हल्ल्यात महिलांसमोर त्यांच्या पतीवर गोळ्या झाडल्या त्यामुळे मायभगिनींचे कुंकू पुसले गेले.
म्हणून त्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले. हा त्या महिलांच्या सिंदूरचा बदला आहे.
या हवाई हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे नाव सुचवले होते.
भारतीय सैन्याने हे ऑपरेशन सिंदूर राबवले.
या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला.