Rajanand More
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान झाले. शनिवारी (ता. 7) निकाल असून कोण सत्ता काबीज करणार याची उत्सुकता लागली आहे.
एक्झिट पोलमध्ये भाजपला सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भाजप कुणाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एक्सिस माय या संस्थेने कुणाला किती जागा मिळणार, याबरोबरच मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती मिळणार, याचाही सर्व्हे केला आहे. त्यामध्ये भाजपकडून प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत.
सर्व्हेमध्ये भाजपची सत्ता येताना दिसत असली तरी लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतर वर्मा यांचा क्रमांक लागतो.
खासदार मनोज तिवारी आणि भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना पसंती असली तरी ते तळाला आहेत.
माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी निवडणुकीच्या राजकारणातून वर्षभरापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. सर्व्हेत 9 टक्के लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे.
भाजपने मागील काही वर्षांत अनेकदा धक्का दिला आहे. चर्चेतील नावांऐवजी एक नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे केला आहे. त्यामुळे दिल्लीतही धक्कातंत्राचा अवलंब होणार, अशीच चर्चा आहे.
भाजपच्या दिवंगत नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज हे नावही पुढे येऊ शकते. त्या सध्या लोकसभेच्या खासदार आहेत.