Rashmi Mane
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून सगळ्याच पक्षातून इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.
प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांला आपला नेता आणखी मोठा व्हावा, मोठ्या पदावर जावा असं वाटत असंत. त्यांसाठी कार्यकर्ते झटत असतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा सिलसिला सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका विषयाने डोकं वर काढलंय.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावचे जावई असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी 'भावी मुख्यमंत्री' असे फलक लावण्यात आले आहेत.
काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी 2024 नाही तर आताच मुख्यमंत्री पदावर दावा असल्याच सांगितले आहे.
नागपूरमध्ये भाजप कार्यकत्यांकडून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पोस्ट झळकली.
याआधी देखील राष्ट्रवादी कार्यालयासमोर सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील भावी महिला मुख्यमंत्री असे पोस्टर लागले होते.
जयंत पाटील यांच्या गावात देखील असेच पोस्टर लागले होते.
अनेक वेळा या पोस्टरबाजी मागे नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच जास्त उत्साही होतांना दिसतात.