Rashmi Mane
ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे २१ एप्रिल रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर वेटिकनमध्ये शोकसत्र सुरू असून, नवीन पोपच्या निवडीसाठी तयारी सुरू झाली आहे.
पोपच्या निधन झाल्यामुळे कार्डिनल्सच्या कॉलेजमधील 138 सदस्य नवीन पोपच्या निवडीसाठी 'कॉन्क्लेव्ह'मध्ये सहभागी होतील. शतकानुशतके जुन्या व्हॅटिकन परंपरेनुसार पोपची निवड केली जाते.
80 वर्षांखालील कार्डिनल्स कॉलेज सिस्टिन चॅपलमध्ये गुप्तपणे मतदान करतात. या कॉन्क्लेव्हमध्ये चार भारतीय वेटिकनमध्ये नवीन पोप निवडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत.