Amit Ujagare
मुंबई महानगर प्रदेश या ६,३२८ किमी चौरस किमी भागातील एकूण ९ महापालिकांमध्ये गुरुवारी मतदान पार पडलं. यानंतर लगेचच एक्झिट पोल्सही जाहीर झाले, साम टीव्हीनं घेतलेल्या एक्झिट पोल्समध्ये कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार? याचे अंदाज पाहुयात.
मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष राहण्याचा अंदाज आहे. तसंच शिवसेना-भाजपला इथं स्पष्ट बहुमतही मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून ठाकरे सेना आणि मनसेचा दारुण पराभवाचा अंदाज आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष राहण्याची शक्यता असून भाजप दुसरा मोठा पक्ष राहण्याचा अंदाज आहे.
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.
भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पार्टी हा दुसऱ्या स्थानी राहील असा अंदाज आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष राहील असा अंदाज असून दुसरा सर्वात मोठा पक्ष भाजप राहील.
मिरा-भायंदरमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष राहू शकतो तर शिंदेसेना हा दुसरा पक्ष राहू शकतो.
नवी मुंबईत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून शिंदे सेना दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरेल.
पनवेलमध्ये तर भाजप क्लीनस्विप देईल असा अंदाज आहे. एकटा भाजप इथं बहुमताचा आकडा गाठू शकतो.