Rashmi Mane
राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २4 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.
देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड 10 जून 1999 रोजी घडली. याच दिवशी रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची औपचारिक स्थापना केली.
पक्ष म्हंटल की चिन्ह आलंच. चिन्ह ही पक्षाची ओळख असते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घड्याळ आहे.
पक्षाच्या स्थापनेसाठी 17 जून 1999 ला मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक घेण्यात आली.
17 जून 1999 त्याच दिवशी शिवाजी पार्कला खुले अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.
मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये 10 वाजून 10 मिनिटांनी पक्ष स्थापन करण्याची मिटिंग झाली होती. ती वेळ दाखवणारे घड्याळ पक्षाचे चिन्ह असावे अशी मागणी करण्यात आली.
'घड्याळ' हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह झाले.