Anand Dighe : 'आनंद दिघें'ना का म्हणतात ठाण्याचे 'बाळासाहेब ठाकरे' ?

Rashmi Mane

आनंद दिघे

"शिवसेनेचं ठाणे...ठाण्याची शिवसेना" हे सूत्र पक्कं करण्यासाठी अगदी तळागळापर्यंत पोहचवण्याचं काम करणारे नेते 'आनंद दिघे' .

Anand Dighe | Sarkarnama

शिवसेना रुजवण्यासाठी सिंहाचा वाटा

शिवसेनेची शाखा, संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. 

Anand Dighe | Sarkarnama

पूर्ण नाव

दिघेंचे पूर्ण नाव 'आनंद चिंतामणी दिघे'.

Anand Dighe | Sarkarnama

जन्म

आनंद दिघेंचा जन्म २७ जानेवारी १९५२ ला झाला. 

Anand Dighe | Sarkarnama

बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव

ठाण्यातील टेंभी नाका परिसरामध्येच दिघे यांच घर होतं. याच परिसरात असणाऱ्या सेंट्रल मैदान भागामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. त्या सभा ऐकूनच बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेसाठी काम करण्याचं ठरवलं.

Anand Dighe | Sarkarnama

लोकप्रिय नेते

हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या आनंद दिघे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यानंतर १९८४ मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बनले. अल्पावधीतच ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले.

Anand Dighe | Sarkarnama

‘आनंद आश्रम’

आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच ‘आनंद आश्रमा’ची स्थापना केली. या आश्रमात दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरायचा. तेथूनच समाजहिताची कामे सुरू झाली.

Anand Dighe | Sarkarnama

‘जनता दरबार’

आपल्या तक्रारी घेऊन लोक सकाळपासून रांगा लावून उभे असायचे. समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीकाही त्यावेळी त्याच्यावर ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती.

Anand Dighe | Sarkarnama

‘धर्मवीर’

आनंद दिघे यांनी लोकांना संघटीत करण्यासाठी अनेक उत्सवांचं आयोजन केलं. त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसैनिकांनी ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली.

Anand Dighe | Sarkarnama

‘आपला नेता’

आनंद दिघे यांची सामान्यांमध्ये ‘आपला नेता’ अशी ओळख होती. त्यांनी केलेल्या लोकहिताच्या कामांमुळेच त्यांच्या मृत्यूला दोन दशक होऊन सुद्धा ठाणेकर आनंद दिघेंना विसरलेले नाही. या कारणामुळेच 'आनंद दिघे' यांना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे.

Anand Dighe | Sarkarnama

मृत्यू....

आनंद दिघे Armada गाडीतून प्रवास करायचे. ऑगस्ट २००१ मध्ये वंदना 'एसटी' बस डेपोजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान २६ ऑगस्ट २००१ ला त्यांचं निधन झालं. 

Next : इंग्रजीही नीट बोलता येत नव्हतं, तरी हिम्मत न हारता मेहनतीच्या जोरावर बनल्या 'आयएएस' अधिकारी