मतदार यादीत नाव नाही? मग Form-6 बद्दल ही माहिती जाणून घ्या!

Amit Ujagare

1) महाराष्ट्र SIR

महाराष्ट्रात लवकरच तिसऱ्या टप्प्यातील मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी मोहिम (SIR) सुरु होणार आहे. तुमच्या नावात, पत्त्यात, फोटो चुकीचे असतील तर अशी नावं मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

ECI

2) नाव नोंदणी

पण त्याचबरोबर नव्यानं नाव या यादीत नोंदवण्याचा प्रक्रिया देखील सुरु करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं Form-6 हा अर्ज तयार केला आहे.

ECI

3) Form - 6

पण हा Form-6 का महत्वाचा आहे? त्या फॉर्ममध्ये कुठली माहिती विचारली जाते? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ECI

4) A to L sections

Form-6 मध्ये १२ वेगवेगळे सेक्शन आहेत, A ते L अशी ही सेक्शन्स आहेत. यामध्ये तुमची विविध टप्प्यांवरील माहिती भरावयाची आहे.

ECI

5) माहिती काय?

यामध्ये तुमची वैयक्तीक माहिती, नातेवाईकांची माहिती, आधार, जन्म, पत्ता, अपंगत्वाची माहिती अशी विविध प्रकारची माहिती भरावी लागते.

ECI

6) महत्वाचा का?

हा फॉर्म-६ यासाठी महत्वाचा आहे की, जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, त्यांच्यासाठी हा अर्ज आहे. त्यामुळं यात काळजीपूर्वक माहिती भरणं गरजेचं आहे.

ECI

7) मतदानाचा अधिकार

हा फॉर्म भरल्यानंतरच तुम्हाला पहिल्यांदा राष्ट्रीय कर्तव्य निभावण्याचा अर्थात मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे.

ECI

8) नाव काढणे, दुरुस्तीसाठी काय?

त्याचबरोबर जर तुमचं नाव जुन्या यादीतून वगळायचं असेल तर त्यासाठी Form-7 भरावा लागेल. माहितीच्या दुरुस्तीसाठी Form-8 तुम्हाला भरावा लागणार आहे.

ECI