Rashmi Mane
राज ठाकरे आणि मनसेचं राजकारण ९ अंकाभोवतीच फिरते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लकी नंबर आहे 'नऊ'.
राज ठाकरे '९' हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा ९ या नंबरभोवती फिरताना दिसतो.
मनसेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली होती. त्यांनी पक्षाची स्थापनेसाठी ९ हा आकडाच निवडला होता.
राज ठाकरे यांच्या सगळ्या कारचा नंबरही ९ आहे.
२७ (२+७) नोव्हेंबर २००५ ला शिवसेना सोडण्याची घोषणा केली. तसेच १८ (१+८) डिसेंबर २००५ ला शिवसेना सोडली.
९ मार्च २००६ महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. १८ (१+८) मार्च २००६ शिवतीर्थावरील पहिली सभा घेतली.
दोन महिन्यापूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यात टोयोटा कंपनीची नवी गाडी लँड क्रूझर ‘शिवतीर्थ’वर दाखल झाली. नव्या कारचा नंबरही ९ च आहे.
राज ठाकरेंना लकी असणाऱ्या ९ अंकाभोवतीच मनसेचं राजकारण फिरते. कारण उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी ९ या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं.