Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar : ठाकरे - शिंदेंच्या राजकारणात पितापुत्र एकमेकांविरोधात लढणार का ?

Deepak Kulkarni

ठाकरेंची आघाडी....

ठाकरे गटानं आता लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आत्तापासूनच उध्दव ठाकरेंनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

वडील शिंदेंसोबत...

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत आणि सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

मुलगा ठाकरे गटासोबतच...

खासदार कीर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे मात्र ठाकरे गटासोबत कायम आहे. आता ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार तेच असल्याची चर्चा आहे.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

शिवसेना वाढविण्यात मोठं योगदान...

बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावत गजानन कीर्तीकरांनी काम केलं. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र पिंजून काढला होता.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

सलग चार वेळेस आमदार

गजानन किर्तीकर हे 1990 साली ते पहिल्यांदा मालाड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. 1990, 1995, 1999, 2004 अशा सलग चार वेळेस ते आमदार झाले होते.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

दोनवेळा खासदार..

2014 च्या निवडणुकीत गजानन कीर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. तर 2019 साली संजय निरुपम यांचाही मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

मंत्रीपदाची लाॅटरी...

1995 ते 1998 या काळात गजानन कीर्तीकर गृहराज्यमंत्री व पर्यटन राज्यमंत्री होते.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

राणेंच्या मंत्रिमंडळात समावेश...

1998 ते 99 या काळात ते नारायण राणे यांच्या कॅबिनेटमध्ये परिवहन मंत्री होते.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

पित्याविरोधात पुत्र

शिंदे गटात असलेल्या पित्याविरोधात पुत्रालाच उभं करण्याची रणनीती ठाकरे गटाची असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama

NEXT : मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण: नऊ वर्षात घेतले हे ऐतिहासिक निर्णय...

Gajanan Kirtikar Vs Amol Kirtikar | Sarkarnama