सरकारनामा ब्यूरो
आयपीएस कृष्ण प्रकाश हे मूळचे तामिळनाडूचे असून, त्यांनी झारखंड येथून शिक्षण पूर्ण केले.
१९९८ मध्ये त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयपीएस पोस्ट मिळवली. त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले.
२०१७ मध्ये जगातील सर्वात अवघड असलेल्या 'आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस' स्पर्धेत जिंकून 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नाव नोंदवले.
या स्पर्धेत केवळ १६ तासांत त्यांनी ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे असे आव्हान पूर्ण केले.
यासाठी कृष्ण प्रकाश यांनी खूप मेहनत घेतली व 'फ्रान्स'मधील 'आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस' ही स्पर्धा जिंकली.
फिटनेस फ्रिक आयर्नमॅन'
कृष्ण प्रकाश हे फिटनेस फ्रिक असून, नियमित व्यायाम आणि योगासने करतात.
लहानपणापासून जिद्दी, हुशार असलेले कृष्ण प्रकाश हे कामातही तरबेज आहेत.
कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असताना वेशांतर करून पोलिस ठाणे गाठले होते. पोलिस कर्मचारी नागरिकांशी कसे वागतात, याची चाचपणी केली होती.
'डॅशिंग अधिकारी' म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील अनेक धाडसी कारवायांमध्ये त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.