Yamini Jadhav : यामिनी जाधव यांची स्थावर मालमत्ता पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढली

Vijaykumar Dudhale

जंगम मालमत्ता घटली

यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये भायखळा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यावेळच्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे दोन कोटी 74 लाख वीस हजार 96 रुपये एवढी जंगम मालमत्ता होती. 2024 मध्ये ती मालमत्ता एक कोटी 48 लाख 69 हजार 589 रुपये एवढी दाखवण्यात आली आहे.

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

लोकसभा तिकिटाची लॉटरी

शिवसेनेतील बंडात यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. या निवडणुकीत त्यांना लोकसभेच्या तिकिटाची लॉटरी लागली आहे.

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

स्थावर मालमत्ता वाढली

यामिनी जाधव यांची 2019 मध्ये तीन कोटी 49 लाख 50 हजार इतकी स्थावर मालमत्ता होती, तर 2024 मध्ये 4 कोटी 96 लाख 88 हजार आणि वारसाहक्क तसेच मुलाने भेटीच्या माध्यमातून दिलेली 3 कोटी 37 लाख 57 हजार म्हणजे एकूण 8 कोटी 34 लाख 45 हजार एवढी स्थावर मालमत्ता दिसत आहे. वाहन नाही

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

वाहन नाही

शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या नावावर कोणतही वाहन नाही

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

स्थावर वाढली; पण जंगम घटली

यामिनी जाधव यांची स्थावर मालमत्ता वाढलेली दिसत असताना जंगम मालमत्ता मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

कर्जात घट

यामिनी जाधव यांच्याकडे 2019 मध्ये दोन कोटी 65 लाख 02 हजार 552 रुपये कर्ज हेाते. त्यात 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत असून अवघे 46 लाख रुपये कर्ज त्यांच्या नावावर दिसत आहे.

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

4 लाख रोकड

आमदार यामिनी जाधव यांच्याकडे 4 लाख 33 हजार 296 रुपयांची रोकड आहे.

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

साडेपस्तीस लाखांचे सोने

यामिनी जाधव यांच्याकडे 35 लाख 62 हजार 500 रुपयांचे सोने आहे.

Yamini Yashwant Jadhav | Sarkarnama

महाराष्ट्रातील 'या' आहेत तिसऱ्या टप्प्यातील 'हाय व्होल्टेज' लढती!

Maharashtra Lok Sabha Election 2024 | Sarkarnama