Yashobhumi Inauguration : 'भारत मंडपम्' पेक्षाही भव्य 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर'; जाणून घ्या काय आहेत त्याची वैशिष्ट्ये...

Rashmi Mane

'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर'

दिल्लीतील द्वारका येथे 'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर' बांधण्यात आले आहे.

Yashobhumi | Sarkarnama

17 सप्टेंबर उद्घाटन

पंतप्रधान मोदी रविवारी (17 सप्टेंबर) ला 'यशोभूमी' सेंटरचं उद्घाटन करणार आहेत.

Yashobhumi | Sarkarnama

उद्घाटन

भारत मंडपम् पेक्षाही भव्य अशा 'कन्व्हेन्शन सेंटर'चे उद्घाटन होणार आहे.

Yashobhumi | Sarkarnama

जागतिक दर्जाचे एक्स्पो सेंटर

'यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर' हे जागतिक दर्जाचे एक्स्पो सेंटर असणार आहे.

Yashobhumi | Sarkarnama

भव्य सेंटर

हा प्रकल्प ८.९ लाख चौरस मीटर जागेवर विस्तारलेला असून, त्यापैकी १.८ लाख चौरस मीटर जागेवर बांधकाम करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये सभा, परिषदा, प्रदर्शने आयोजित करता येणार आहेत.

Yashobhumi | Sarkarnama

वैशिष्ट्य

या सेंटरमध्ये एकूण 15 कॉन्फरन्स हॉल आणि 13 बैठक हॉल आहेत. एकाचवेळी 11 हजार लोक एकत्र बसू शकतील एवढा मोठा हॉल आहे.

Yashobhumi | Sarkarnama

आशियातील भव्य सेंटर

हे सेंटर पूर्ण झाल्यानंतर ते आशियातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर ठरणार आहे. 2025 मध्ये ते पूर्णपणे तयार होईल.

Yashobhumi | Sarkarnama

खर्च

'यशोभूमी' सेंटर बांधण्यासाठी एकूण 25 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 5400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात एक कन्व्हेन्शन सेंटर, 13 कॉन्फरन्स रूम आणि दोन एक्झिबिशन हॉल आहेत.

Yashobhumi | Sarkarnama

दुसऱ्या टप्प्यात

दुसऱ्या टप्प्यात तीन प्रदर्शन संकुल, हॉटेल आणि काही कार्यालये बांधण्यात येणार आहेत. येथील सभागृहात 6 हजार लोक एकत्र बसू शकतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

G20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या 'जॉर्जिया मेलोनी' यांनी घेतली ऋषी सुनक यांची भेट...पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा