Aslam Shanedivan
यमनच्या तुरुंगात गेल्या तीन वर्षांपासून एक भारतीय नर्स बंदी आहे. ती केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील आहे
तिचे नाव निमिषा प्रिया असे असून तिला 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे.
निमिषा प्रिया 2008 नंतर यमनमध्ये तलाल अब्दो मेहदीशी पार्टनरशीप करत स्वतःचे क्लिनिक उघडले. पण मेहदीशी वाद वाढत गेल्याने तिच्या तक्रारीवरून मेहदीला तुरुंगवास झाला.
बाहेर येताच मेहदीने तिला त्रास देत पासपोर्ट काढून घेतला. तोच घेण्यासाठी तिने त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिले. ज्यात तो मरण पावला. या गुन्ह्यातच तिला फाशीची शिक्षा झाली आहे.
यातून तिची सुटका फक्त ब्लड मनीच्या माध्यमातून होऊ शकत होती. पण त्यासाठी मेहदी कुटुंब तयार नाही. तसेच सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने देखील हतबलता दर्शवली आहे
केंद्राने कोर्टात निमिषा प्रियाची फाशी रोखण्यासाठी सरकार आणखी काही करू शकत नाही, असे स्पष्टीकरण देताना हे खूप दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे
ब्लड मनी म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार आरोपीला माफ करायचे की शिक्षा द्यायची याचा अधिकार पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला असतो. त्या प्रमाणे अनावधानाने झालेल्या हत्येच्या प्रकरणांमध्ये आर्थिक भरपाई देता येते.
या कायद्यानुसार निमिषा प्रियाकडून तलालच्या कुटुंबाला ब्लड मनी म्हणून 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 8.57 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.