सरकारनामा ब्यूरो
प्रणिती शिंदे या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिल्या आहेत.
भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची कन्या आहेत. त्या सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात सक्रिय आहेत.
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा आमदार आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात या कॅन्सरतज्ञ आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. संगमनेर मतदार संघात त्या सक्रिय आहेत.
विजयकुमार गावित यांच्या कन्या हीना गावित या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार आहेत.
रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव कन्नड सोयगाव मतदार संघातून राजकारणात पदार्पण करण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे - खेवलकर या २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजप तर्फे निवडणूक लढल्या होत्या.
विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या कन्या आहेत. त्या सध्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत.