Former CP Sanjay Pandey News : पाच महिन्यांनंतर संजय पांडे यांची तिहार तुरुंगातून सुटका

30 जून 2022 रोजी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते.
Sanjay Pandey|
Sanjay Pandey|

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस (Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर अखेर आज त्यांची तिहार जेल मधून सुटका करण्यात आली आहे. १९ जुलै २०२२ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर जवळपास पाच महिन्यांनी त्यांची सुटका करण्यात आली. ८ डिसेंबर २०२२ रोजी  दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी अटींसह जामीन मंजूर केला होता.

30 जून 2022 रोजी संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. 

Sanjay Pandey|
Sanjay Pandey Grant Bail : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जामीन मंजूर

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह त्यांच्या आई संतोष पांडे व मुलगा अरमान पांडे यांच्यावर सीबीआयने नुकताच गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही  (ED)  पांडे यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला. याशिवाय ईडीने एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना याच प्रकरणात अटक केली होती.


ईडीने पाच जुलै रोजी पांडे यांची एका प्रकरणात चौकशी केली होती. आता ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने शुक्रवारी पांडे यांच्या घरी तसेच एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण आणि रवी नरेन यांच्यासह अन्य काही जणांच्या घरांवर छापेमारी केली होती. देशात मुंबई, पुण्यासह जवळपास 18 ठिकाणी ही कारवाई झाली होती. यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com