Amarmani Case News : 20 वर्षांच्या शिक्षेत तुरूंगवारी फक्त 16 महिन्यांची; अमरमणी दांम्पत्याची रंजक कहाणी!

Amarmani Tripathi Release Case News : "पती-पत्नी दोघेही मेडिकल कॉलेजमध्येच उपचार घेत होते.."
Amarmani Case News
Amarmani Case News Sarkarnama
Published on
Updated on

Gorakhpur News : कवयत्री मधुमिता शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी यांची शुक्रवारी मुदतपूर्व सुटका करण्यात आली. त्यानंतर ते त्यांच्या निवासस्थानी गेले नाहीत. शनिवारीही त्यांना उपचारासाठी गोरखपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यात विशेष बाब म्हणजे मागील दहा वर्ष शिक्षा भोगत असताना मणी दाम्पत्य त्यातील केवळ १६ महिनेच तुरुंगात राहिल्याची, माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

मणी दाम्पत्य तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा बराचसा वेळ बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात गेला. आजारावरही प्रश्न निर्माण झाले. प्रकरण न्यायालयात पोहोचले. आता शिक्षेतून सुटका झाल्यानंतर पुन्हा आजाराचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून वैद्यकीयसह कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याला महत्त्व दिले जात आहे.

Amarmani Case News
NCP Leader Sunil Tatkare News : आता माघार नाही, पुढेच जाणार ; तटकरेंनी स्पष्टच सांगितले...

मुलगा अमनमणी त्रिपाठी यांनी सांगितले की, लवकरच त्यांना हॉयर सेंटरमध्ये पाठवले जाऊ शकते. तेथून उपचार करून दोघेही घरी परतू शकतात. शुक्रवारी सायंकाळी सुटका झाल्यानंतरही त्रिपाठी दाम्पत्य वैद्यकीय महाविद्यालयातच होते. शनिवारीही त्यांच्या खोलीबाहेर शांतता होती. प्रत्येक पुढची पायरी अत्यंत काळजीपूर्वक उचलली जात आहे. मुलगा अमनमनी आता इथेच राहून उपचार करणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील निर्णय घेतला जाईल.

Amarmani Case News
Wadettiwar on BJP : घर चलो अभियान नाही, तर ही अखेरची घरघर; ‘मसीहा’ येताच किती ‘आऊट’ झाले, देशाने पाहिले !

तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुमणी ४ डिसेंबर २००८ रोजी हरिद्वार तुरुंगातून गोरखपूर तुरुंगात शिफ्ट झाले होते, तर अमरमणी १३ मार्च २०१२ रोजी येथे आला होता. तुरुंगात गेल्यानंतर दोघेही आजारी पडले. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०१३ रोजी अमरमणी यांना बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांनी १३ मार्च २०१३ रोजी मधुमणीही मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली. तेव्हापासून पती-पत्नी दोघेही मेडिकल कॉलेजमध्येच उपचार घेत होते. वीस वर्षांत मणी दाम्पत्य केवळ १६ महिने तुरुंगात राहिल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com