नरेंद्र मोदी साधारण व्यक्ती नव्हेत, देवाचे अवतार आहेत!

प्रधानसेवकाच्या रुपाने मोदी आपल्यात काम करण्यासाठी आले आहेत, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं आहे.
A temple dedicated to Prime Minister Narendra Modi in Gujarat.
A temple dedicated to Prime Minister Narendra Modi in Gujarat.File Photo
Published on
Updated on

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे मंदीर पुण्यातील एका भाजप कार्यकर्त्याने नुकतेच उभारले होते. त्यावर वाद झाल्यानंतर हे मंदीर दुसऱ्याच दिवशी लगेच हटवण्यात आलं. पंतप्रधान कार्यालयातूनच हे मंदीर हटवण्याचे आदेश आले होते, असे पुढे आले होते. आता भाजपच्या एका मंत्र्याने पंतप्रधान मोदींविषयी असंच वक्तव्य केलं आहे. मोदी हे सर्वसाधारण व्यक्ती नव्हे तर देवाचे अवतार असल्याचे या मंत्र्यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी (Upendra Tiwari) यांचे हे वक्तव्य आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते अनेकदा प्रकाशझोतात आले आहेत. या वक्तव्यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हरदोई येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींना देवाचा अवतार म्हटले आहे. ते म्हणाले, असे महापुरूष पृथ्वीवर एकदाच येतात. मोदी हे त्यापैकी एक आहेत. ते साधारण व्यक्ती नाही तर साक्षात देवाचे अवतार आहेत. प्रधानसेवकाच्या रुपाने मोदी आपल्यात काम करण्यासाठी आले आहेत.

A temple dedicated to Prime Minister Narendra Modi in Gujarat.
वानखेडेंचा 'निकाहनामा' आला समोर! मलिकांनी दिला आणखी एक पुरावा

तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच इंधन दरवाढीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. मागील सात वर्षात लोकांचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढली असली तरी केवळ मुठभर लोकांनाच पेट्रोल गरज आहे. जे कार वारतात, त्यांना ही गरज आहे. तर 95 टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही. प्रतिव्यक्ती उत्पन्नाचा विचार केल्यास पेट्रोल व डिझेलचे दर कमी आहेत. शंभर कोटींहून अधिक लोकांना मोफत लस देण्यात आली आहे. मोफत उपचार करण्यात आले आहेत. घरोघरी औषधं वाटली जात आहेत. मोफत शिक्षण दिले जात आहे, असं तिवारी म्हणाले होते.

तर आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष भावेश कलिता यांनीही नुकतीच एक घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले की, पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांजवळ पोचल्यानंतर राज्यात दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास आसाम सरकार परवानगी देणार आहे. पेट्रोल 200 रुपयांवर गेल्यानंतर आम्ही दुचाकीवर ट्रिपल सीट जाण्यास परवानगी देऊ. याचबरोबर तिघे बसू शकतील, अशा दुचाकींचे उत्पादनही घेण्याची सूचना केली जाईल.

लोक इंधन बचतीसाठी लक्झरी कार चालवण्याऐवजी एकाच दुचाकीवर तिघे बसून जाण्यास प्राधान्य देतात, असे विधान कलिता यांनी केले होते. यावरून गदारोळ उडाल्यानंतर त्यांनी हा खुलासा केला आहे. दुचाकीवर ट्रिपल सीट अधिकृतपणे जाण्यास परवानगी देण्याची सरकारी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 200 रुपयांच्या जवळ जाण्याची अट घातली आहे. या घोषणेवरूनही वाद निर्माण झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com