मोदीजी, कोणावरही आत्महत्येची वेळ आणू नका...

Manish Sisodia : "अधिकाऱ्यांवर दबाव आणू नका, त्यांचे घर उद्ध्वस्त होत आहे."
Manish Sisodia
Manish Sisodiasarkarnama

दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. "मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, तुम्ही मला खोट्या मार्गाने अडकवू इच्छित आहात. मला अडकवा, माझ्यावर धाडी मारा. मात्र अधिकाऱ्यांवर असा दबाव आणून, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. त्यांचे घर उद्ध्वस्त होत आहे. तुम्ही सतत हाच विचार करत असता की, सीबीआय - ईडीचा वापर कसा करता येईल. निवडून आलेले सरकारला कसं पाडता येईल," अशा शब्दात सिसोदिया यांनी पंतप्रधान मोदींना सुनानले आहे.

Manish Sisodia
अरविंद सावंतांचे अमित शहांना प्रत्युत्तर; बंगाल, पंजाब अन् दिल्लीसारखी परिस्थिती होईल

सीबीआयचे अतिरीक्त कायदेशीर सल्लागार जितेंद्र कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती मनीष सिसोदिया यांनी सांगितली. त्याची संपूर्ण बातमी प्रसारमाध्यमांमध्ये दाखवण्यात आली. सिसोदिया म्हणाले, जितेंद्र कुमार हे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेत कायदेशीर सल्लागार होते, अशी माहिती मिळाली आहे.

Manish Sisodia
'सत्तांतर होऊनही त्यांच्या डोक्यातील हवा अजून गेली नाही; ऑपरेशन करावे लागेल'

जितेंद्र कुमार हे मद्य धोरण प्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआर संबंधी कायदेशीर बाबी पाहत होते. माझ्यावर चुकीच्या पद्धतीने केस करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे. मला अटक करण्याची तयारी सुरू होती, मात्र जितेंद्र कुमार अशा गोष्टींना मान्यता देत नव्हते.

"या प्रकरणाबाबत त्याच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की ते मानसिक तणावाखाली आले आणि शेवटी त्यांनी आत्महत्या केली. सीबीआय अधिकाऱ्यावर चुकीचे काम करण्यासाठी इतका दबाव टाकण्यात आला की त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले, ही अत्यंत खेदजनक घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांनांप्रती माझ्या संवेदना आहेत," असे सिसोदिया म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com