Winter session of Parliament : 7 डिसेंबरपासून सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन

Winter session of Parliament | ७ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
Parliament's Winter Session
Parliament's Winter Session

Winter session of Parliament नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) तारखांची घोषणा केली. ७ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ''अमृत काळात अधिवेशनादरम्यान विधिमंडळाचे काम आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अधिवेशनात 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील बैठक आणि कामकाजाची माहिती देताना केंद्रीय मंत्री जोशी यांनी ट्विट केले की, 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 23 दिवसांत 17 बैठका होणार आहेत.

Parliament's Winter Session
Shraddha Walker च्या वडिलांचे आफताबवर धक्कादायक आरोप....

विशेष म्हणजे, हिवाळी अधिवेशन जुन्या संसदेच्या इमारतीत होण्याची शक्यता आहे. तसेच या महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सुमारे 1,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन संसद भवनाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा विचारही सरकार करत असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशन साधारणपणे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि अधिवेशनादरम्यान सुमारे 20 बैठका होतात. परंतु 2017 आणि 2018 मध्ये डिसेंबरमध्ये अधिवेशन भरल्याचीही उदाहरणे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com